S3 goatfarm

S3 goatfarm Scientifically proven practice of goatfarming ,consaltancy ,farm setup ,artifical insemenation using frozen & fresh semen both at Your Services.

*बोअर  शेळ्या बद्दल  काही  गैरसमज* सध्या  बोअर  शेळ्यांच्या  नावाने खडे  फोडण्याची  फॅशन  आली  आहे. बोअरविषयी टिका  करून...
02/08/2018

*बोअर शेळ्या बद्दल काही गैरसमज*

सध्या बोअर शेळ्यांच्या नावाने खडे फोडण्याची फॅशन आली आहे.
बोअरविषयी टिका करून आपण शेळीपालकांच्या हिताची गोष्ट केली आहे असा अविर्भाव आणला जातो. त्यानिमित्ताने हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न.

काही काॅमन आक्षेप व त्याची माझ्या दृष्टीकोनातून उत्तरे

*1) बोअर पालन हे इमूपालन प्रमाणेच होणार आहे.*

कोणताही फसवणुकिचा प्रकार दिर्घकाळ टिकू शकत नाही.
बोअर जात भारतात येऊन 2/3 दशके झाली तरीही आज बोअर चे ना मार्केट कमी झाले ना भाव कमी झाला!
जर गूणवत्ता नसेल तर कितीही स्वस्त वस्तू असू देत ... ती बाजारात टिकू शकत नाही.
आणि जर गुणवत्ता असेल तर कितीही महागडी वस्तू बाजारात टिकू शकते. (आयफोन ची किंमत 70000 आहे आणि त्यासाठी सुद्धा वेटिंग आहे)
इमूपालन हा व्यवसाय प्रकारच मुळात फसवा होता व त्यात गूणवत्तेचा लवलेश ही नव्हता. तो ईमुची अमुक एक जात चांगली नव्हती म्हणुण तो टिकू शकला नाही असे झाले का?
आणि तेच जर निकष लावायचे झाले तर संपुर्ण शेळीपालन अमुक एका जातीचे केल्यास कोणीच तोटयात जाणार नाही हे १००% खात्रीने सांगा कोणीही !!!.
बोअर जात ही खराब आहे, खूप आजारी पडते, मरतूक खूप आहे, भाकडकाळ जास्त आहे, पिल्ले जुळे तिळे होत नाहीत, वजन वाढत नाही असे असल्याने मी फार्म बंद केला असे कधी ऐकण्यात आले आहे का ? त्यामुळे इमूपालन व बोअर शेळी पालन याची तुलना होऊ शकत नाही.

*2) बोअरचे मटण एवढ्या महाग किमतीत कोण घेणार ?*

या प्रश्नातच विचारणार्याचे अज्ञान प्रकट होते. बोअर ही ब्रिडिंग साठी प्रसिद्ध आहे.मुळात ब्रिडींग व कटिंग या वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
ब्रिडिंग म्हणजे फक्त फार्म वर जनावरे पाळणे व दुसर्याला पाळण्यासाठी विकणे असा अर्थ होत नाही.
ब्रिडिंग म्हणजे चांगल्या गूणवत्तेच्या नर व मादीचा संकर करून अधिक गुणवान प्रजाती तयार करणे.
आणि बोअर ही जात याच कारणासाठी भारतात व जगातील ईतर देशात आयात केली गेली आहे.
आणि बोअर जर किमतीने स्वस्त असत्या तर मटणसाठी त्यापेक्शा कोणती जात तुम्ही ठेवली असती?

*3) बोअरच्या शेळ्या बाजारात 400 रूपयाने सूदधा घेणार नाही.*

बरोबर आहे. सोनंसुद्धा बाजारात मिळत नाही त्यासाठी सोनाराकडेच जावं लागतं व तिथेच त्याची खरी किंमत कळते.

*4)100% बोर भारतात उपलब्ध नाही.*

अगदी खरं आहे !!!
भारतात उपलब्ध असलेले बोअर हे संकरीत आहेत. त्यामुळे आपल्याला 98/99 % पर्यंत शूद्ध बोअर मिळू शकतात 100% नाही. परंतु त्यांची गूणवत्ता सूदधा चांगली आहे.
साधारण 95%(6वी पीढी) च्या पूढील बोर हे आपल्याकडे pureline समजले जातात.
100% बोर ला pure blood किंवा true blood असे संबोधले जाते.
कॅलक्यूलेशन साठी निंबकर किंवा kvk बारामती यांच्या pureline ला 100% समजले जाते.

*5) बोअर ईदला चालत नाही*

ईद म्हणजे देवनार असा एक मोठा गैरसमज आहे .
कोणत्याही बंदिस्त फार्म वरिल प्राणी हे देवनार येथील गलिच्छ वातारणात जास्त काळ तग धरू शकणार नाही. बोअर ही त्याला अपवाद नाही.
ईद साठी प्राण्याची जात नव्हे रुबाब पाहिला जातो. ईद साठी बोअर ची जी विक्री होते ती देवनार च्या बाहेर होते परंतु इतर जातींच्या तूलनेने हे प्रमाण कमी आहे कारण बोअर हे प्रामुख्याने ब्रिडिंग साठीच पुरत नाही. बर्याच गूणवत्ता धारक फार्मर कडे आजही अगोदरच बूकिंग असते.

*6) बोअर चे मटण चवीला चांगले नाही*

कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार आहे हा !
मूळात असे सांगणार्याने बोअर चे मटन खाल्ले का हाच प्रश्न आहे!
आज जगभरात export quality meat जे ऊपलब्ध आहे ते प्रामुख्याने बोअरचे आहे.
बोअर ही जात याचसाठी प्रसिद्ध आहे.

*7) बोअर शेळ्या खरेदी मध्ये फसवणूक केली जाते*

दुर्दैवाने काही प्रमाणात तथ्य आहे .काही लोक (सर्व नाही) कमी %च्या शेळ्या जास्त % सांगूण फसवणूक करतात.
परंतु यासाठीही खरेदीदार दोषी नाही का?. आपण जेव्हा एखाद्यी गोष्ट खरेदी करण्यास जातो तेव्हा आपणास त्या गोष्टी ची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
बोर प्यूरिटी ओळखण्याचे बरेच उपाय आहेत उदाहरणार्थ वजनवाढ शरीर रचना, कान , शिंगे, वंशावळ इत्यादी. या सर्वांचा अभ्यास करून खरेदी केल्यास फसवणूक टाळता येईल.

*8) बोर जात खूप महाग आहे.*

अगदी खरं आहे हे परंतु त्यामुळे आपण या जातीची गूणवत्ता डावलून केवळ किमतीमूळे टीका का करावी? काही सोपे ऊपाय आहेत यावर...
✅ निंबकर सीडस फलटण यांच्या कडे केवळ 100 रूपये मद्धे कृत्रिम रेतन स्ट्राॅ मिळतात. त्याचा फायदा घ्यावा.
✅ सरकारदरबारी दबाव आणून true blood चे कृत्रिम रेतन स्ट्राॅ आयतीस परवानगी मिळवावी.
✅ 3/4 जवळपास च्या फार्मरने एकत्र येऊन चांगला नर घ्यावा.

*9) जर सगळीकडे बोअर चे प्रमाण वाढले तर मार्केट असेच राहील का ?*

ती वेळ येण्यासाठी खूप वर्षं लागतील.
ज्या प्रमाणात नवीन फार्म येत आहेत. त्याच प्रमाणात बंद ही होत आहेत.(कारणं प्रामुख्याने कागदावरचे कॅल्क्युलेशन, नियोजनशून्य मॅनेजमेंट , उंटावरून शेळ्या हाकणे इत्यादी)
त्यामुळे एवढे saturation होण्यासाठी खूप वेळ लागेल.
परंतु जेव्हा हे होइल तेव्हा खरंच शेळी पालनास अच्छे दिन येतील. कारण कमी कालावधीत जास्त वजनवाढ देणारी ही जात असल्याने त्यावेळी मटना साठी बोअर विकणे सूदधा फायदेशीर राहील

या पोस्ट चा उद्देश फक्त बोअर जातीचे महत्व समजावून सांगणे एवढेच आहे. ही एकमेव जात आहे. ज्या मध्ये मध्यस्थ ,एजंट कोणी नसून फक्त फार्मर टू फार्मर एवढीच लिंक आहे. तेव्हा कोणतेही काॅपी पेस्ट करण्यापूर्वी, कोणत्याही कमेंट करण्यापूर्वी आपण आपल्या कोण्या शेतकरी बांधवाचे नूकसान तर करत नाही ना याची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे.

🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏*नवीन  शेळी पालन  सूरू  करत आहात* ?🤗🤗🤗*ब्रीड  कोणती  निवडावी  या संभ्रमात  आहात*?😯😯😯*स्थानिक जाती पासून  अपेक्षि...
12/12/2017

🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏
*नवीन शेळी पालन सूरू करत आहात* ?🤗🤗🤗

*ब्रीड कोणती निवडावी या संभ्रमात आहात*?😯😯😯

*स्थानिक जाती पासून अपेक्षित उत्पन्न मिळेल का याची शंका वाटते*?🤔🤔🤔

*आणि जर तूम्हाला प्रिमियम काॅलिटी च्या संपूर्ण बंदिस्त, लसिकरन केलेल्या जास्त उत्पन्न देणार्या शेळ्या अतिशय रिजनेबल रेट मध्ये मिळत असतील तर*😍😍😍

*फक्त सिरियस खरेदीदारांनीच संपर्क करावा*.
*ऑफर ही फक्त लाॅट मध्ये खरेदी करणार्यां साठीच आहे*. *फक्त चौकशी साठी टाइम पास साठी फोन करू नये*
☎. 9420766645

First artificial  insemination generation  of boer male kid born weight 4.500 kg.
26/11/2017

First artificial insemination generation of boer male kid born weight 4.500 kg.

Address

Pirtakli/kamti Khurd Road
Solapur
413002

Telephone

919420766645

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S3 goatfarm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category