समृद्धी गोट फार्म प्रायव्हेट लिमिटेड

  • Home
  • India
  • Shirdi
  • समृद्धी गोट फार्म प्रायव्हेट लिमिटेड

समृद्धी गोट फार्म प्रायव्हेट लिमिटेड Goat farm breeder and traders

🍅 टोमॅटो पिकासाठी नवीन पद्धतीने बांबूचा आधार / तारकाठी करण्याची पद्धत 🍅वरील व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर करून आपल्या सर्व श...
14/12/2019

🍅 टोमॅटो पिकासाठी नवीन पद्धतीने बांबूचा आधार / तारकाठी करण्याची पद्धत 🍅
वरील व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर करून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवनवीन माहिती मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून लाल घंटी चे बटन क्लिक करा म्हणजे येथून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील

🍅 टोमॅटो पिकासाठी बांबूचा साठा तयार करणे याबद्दल माहिती चा व्हिडिओ

09/09/2019

गौरी-गणपतीच्या काळात शेपूचे काबीज केले मार्केट

ज्याने सणांचा बारकाईने अभ्यास केला, त्या वेळची मार्केटची गरज अोळखली तो त्या काळात चार पैसे नक्कीच जास्तीचे मिळवून जातो गणेशोत्सवाच्या कालावधीत विशेषतः गौरींचे आगमन होते त्याकाळात शेपूला असलेली मागणी बोरगाव (जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) येथील कोत्तलगे यांनी अभ्यासली. त्यातूनच गेल्या चार वर्षांपासून एक एकरावर दोन हंगामात शेपू घेऊन कोल्हापूरचे मार्केट काबीज करण्यात त्यांना यश आले आहे.
राजकुमार चौगुले

कर्नाटकातील शेतकरी
महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर असलेले बोरगाव (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) हे कर्नाटक हद्दीतील सधन गाव. पंधरा हजारांहून अधिक लोकसंख्येच्या या गावात मराठी आणि कन्नड असे दोन्ही भाषिक राहतात. उसाची सर्वाधिक शेती येथे केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, हुपरी ही गावे येथून १५ किलोमीटर तर कोल्हापूर शहर ३० किलोमीटर अंतरावर आहे.

कोत्तलगे यांची शेती
बोरगावातील बाबासाहेब कोत्तलगे (वय ६०) मुलगा बंडूसहित (वय सुमारे २३) आपल्या नऊ एकर शेतीचा भार सांभाळतात. त्यांची मातृभाषा कानडी असली, तरी त्यांना मराठीही बोलता येते. त्यांचा सात एकरांवर ऊस असतो. अन्य क्षेत्र भाजीपाला शेतीसाठी राखीव ठेवले जाते.

मार्केट अोळखले
गणपती उत्सवाच्या काळात कोल्हापूर मार्केटमध्ये शेपू भाजीची सर्वाधिक रेलचेल असते. अधिक उठाव असतो हे कोत्तलगे यांनी हेरले. या काळातील मार्केट व भाजीचे दर लक्षात घेतले. पिकाचा कालावधी अभ्यासला. उन्हाळ्यात देखील शेपूची आवक कमी असते व दर चांगले असतात हेदेखील कळाले. त्यातून याच भाजीची लागवड करण्यास चार वर्षांपासून प्रारंभ केला.

हुशारीने आखलेली शेपू पीक पद्धती
या पिकाची जमेची बाजू- अत्यंत कमी कालावधीतील पीक- सुमारे २१ दिवसांत काढणी सुरू होते. तिथून सुमारे ८ दिवस प्लॉट चालतो. निवडलेले क्षेत्र- १ एकर लावण एप्रिलमध्ये आॅगस्टमध्ये बाजारात शेपू मेमध्ये गौरी-गणपती उत्सवाच्या काळात

तीन मार्केट ठरतात महत्त्वाची -
बोरगाव (३० किलोमीटर)
प्रथम क्रमांकाचे- कोल्हापूर (जास्तीत जास्त शेपू येथेच जातो.)
द्वितीय- इचलकरंजी
व त्यानंतर कुरूंदवाड (सुमारे १५ किलोमीटर)

- स्वतः जाऊन किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री होते
- ज्या-ज्या वेळेस शेपूचा तुटवडा असतो व कोत्तलगे कुटुंबीयाकडे शेपू असतो, त्या त्या वेळी किरकोळ व्यापारी आदल्या दिवशी ‘ऍडव्हान्स’ देऊन ठेवतात. दुसऱ्या दिवशी दुपारी जागेवर येऊन शेपूची खरेदी करतात. मात्र ही खरेदी दोनशे ते तीनशे पेंढ्यापर्यंत मर्यादित असते. बोरगावांतून शेजारच्या बाजारपेठांत जाणाऱ्या वाहतूकदारांच्या गाड्या आहेत. त्यांच्या संपर्कात असल्याने दरांबाबतची बाजारपेठांतील स्थिती समजते. त्यानुसार शेपूची काढणी व मार्केटला पाठवणी होते.

मिळणारे दर
उन्हाळ्यात - ३०० ते ४०० रु. प्रति १०० पेंढ्या (शेकडा)
- गणपती उत्सवात तीन दिवस - ५०० ते ६०० रु.
- कोणत्याही परिस्थिती याच काळात अधिकाधिक शेपू मार्केटला आणण्याचा प्रयत्न.
- यानंतरच्या काळात दर घसरून पुन्हा ३०० व त्याहून खाली येतात.

सणांचा बारकाईने अभ्यास केला, त्या वेळची मार्केटची गरज अोळखली तर त्या काळात चार पैसे नक्कीच जास्तीचे मिळवता येतात हेच कोत्तलगे यांच्या शेतीवरून समजते.

कोत्तलगे यांची शेपू शेती
- एकरी १० किलो बियाणे लागते. त्यातून सुमारे ८००० ते १० हजार पेंढ्यांपर्यंत मिळते उत्पादन
- बियाणे दरवर्षी विकत घेतले जाते. ( १८० रुपये प्रति किलो)
- मुरमाड जमिनीत नांगरणी, रोटर फिरवून रान तयार केले जाते.
- बैलाच्या साह्याने चार फुटी वाफे तयार केले जातात.
- वाफे तयार केल्यानंतर बिया आणि रासायनिक खते एकाच वेळी विस्कटून टाकले जातात. विद्राव्य खतांची फवारणीदेखील होते.
- फार कोरडे किंवा फार पाणी अशी स्थिती चालत नाही. यामुळे वाफसा स्थितीत रान ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते. दर आठवड्याला हवामानानुसार पाटपाण्याने पाणी दिले जाते. हवामान कोरडे असेल तर महिन्यातून चार वेळा आणि जर पाऊस असेल हे प्रमाण गरजेनुसार कमी केले जाते.
- काढणीच्या हंगामात सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत शेपू काढला जातो. पाण्याने स्वच्छ धुतला जातो. पाणी निथळण्याची क्रिया झाल्यानंतर मार्केटला पाठवला जातो.
- काढणीला मजूर मात्र जास्त लागतात.

गणेशोत्सवात शेपूचे महत्त्व
गणेशोत्सवात शेपूचे विशेष महत्त्व आहे. ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. हा नैवेद्य शेपूशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे प्रत्येकाच्या घरी शेपूची भाजी त्यादिवशी पाहायला मिळते. साहजिकच या काळात वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी नियोजन करून कोत्तलगे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दररोज ७०० ते १००० पेंढ्या शेपू काढतात. शक्‍यतो गणेशोत्सव सुरू होण्याअाधी दोन दिवसांपासून काढणीचे नियोजन होते.

महिन्यात चांगले उत्पन्न देणारे पीक
केवळ एकच महिना कालावधीचे पीक. याच एका हंगामात सर्व खर्च वजा जाता एकरी किमान १० हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. उत्पादन, मागणी, दर यानुसार या उत्पन्नात चांगली वाढदेखील होते. म्हणजेच उन्हाळी व गणपती उत्सव अशा एकूण दोन महिन्याच्या दोन हंगामात चांगली कमाई करून देणारे हे पीक असल्याचे कोत्तलगे म्हणतात.

शेपूच का?
कोत्तलगे शेपू व्यतिरिक्त मेथीसारखी सातत्याने तेजीत राहणारी भाजीही घेतात. मात्र अन्य भाजीपाल्याच्या तुलनेत शेपू खराब होण्याचा धोका कमी आहे. खूप पाऊस जरी पडला, तरी माळरानाच्या जमिनीच निचरा लगेच होतो. इतर पालेभाज्या मात्र शेपूच्या तुलनेत हवामानातील घटकांना जास्त संवेदनशील असल्याने लगेच खराब होत असल्याचा कोत्तलगे यांचा अनुभव आहे काही गुंठ्यात दोडका, भेंडी आदी पिकेही असतात. त्यांचाही एकूण अर्थशास्त्रात हातभार लागतो. शेपू काढणीनंतर पुन्हा रान तयार करून ज्वारी, वांगी किंवा अन्य पिके घेतली जातात.

बंडू कोत्तलगे - ०८१९७६५७००८
★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★ ★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय आणी इतर अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेतीमित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर , व्हाट्सअँप ग्रुप वर आणी मित्रांच्या टाईम लाईन वर शेअर करावी ही विनंती.
हि माहिती तुमच्या जरी उपयोगी नसेल तरी ती तुमच्या कोणी मित्रांच्या उपयोगी पडेल.
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★

या पेज वर जी माहिती दिली जाते त्याचे स?

17/08/2019

शेळीपालन व्यावसायाशी निगडीत तसेच या व्यावसायाशी नव्याने जोडू पाहणा-या तसेच हा व्यावसाय करु ईचि्छणा-या तमाम सहकारी बांधवांना नम्र विनंती आहे की ब-याचदा ग्रुपवर चर्चा करतांना निवोदित शेळीपालक बांधव आफ्रिकन बोर, बिटल, शिरोही, जमनापारी, बारबरी,सुरती ईत्यादी महागड्या जातींच्या शेळ्याबद्दलच अधिक चविने चर्चा करतांना दिसतात...
हा व्यावसाय नव्याने करु पाहत असलेल्या व सुरु केलेल्या माझ्या तमाम सहकारी बांधवांनाे आपल्याला या व्यावसायात पाय घट्ट रोवायचा असेल जम बसवून नफा कमवायचा असेल तर सांगीव, एेकीव माहितीवरुन सुरुवातीलाच या महागड्या शेळ्यांच्या जातींच्या मागे लागू नका. आपल्या परिसरातील लोकल जातीच्या, *(पारंपारीक गावठी जातीच्या)* फारफार तर ऊस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करुन शेळीच्या आणि सबंध शेळीपालनाच्या या व्यावसाय चक्राचे आवलोकन करा. समस्या, ऊपाय, व्यावस्थापन, हक्काचे शाश्वत मार्केट, आणि नफा कमावण्याची शक्कल व्यावस्थित जमली तरच प्रयोग म्हणून बोर, बिटल, जमनापारी, सुरती, शिरोही, बारबेरी या पैकी एखाद जातीच्या संगोपनाचा विचार करावा....
एक साधा विचार करा... समजा या महागड्या जातींच्या शेळ्यांचे संगोपन करुनही या आपल्याकडे लोकल मार्केटमधे चालू प्रचलीत दरांनुसारच विकावे लागणार असेल तर ... या महागड्या जातींचे संगोपन म्हणजे एक मृगजळच ठरेल.
ऊदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या जर लोकल जातीचा बकरा बाजारात दलाल किंवा मटन शाॅपवाले सरासरी 220-240 ₹ किलो ने घेत असतील तर 25-30 किलो वजनाच्या बक-याचेही अदाजे सरासरी सुमारे 5500-6500₹ मिळतील ही आपली अपेक्षा असते किंवा तेवढे मिळावे हा अट्टहास असतो. पण एकंदरीतच दलाल किंवा मटन विक्रेत यांची व्यावसायीक पाॅलिसी पाहता ते लोक गरिब शेळीसारखाच शेळीपालकाला समजून सरासरी 4000 ते 4300 ₹ च्या वर भाव द्यायला सहजा सहजी तयारच होत नाहीत... परिणाम स्वरुप शेळीपालक आपल्या व्यावसायीक मर्यादा व आर्थिक निकड लक्षात घेऊन नाविलाजास्तव या चक्रव्यहात सापडतो व नफा तोटा याचा जास्त विचार न करता आपल्या पशूची विक्री करत राहतो....
बरं हे गणित एखाद दुस-या पशुंच्या विक्रीबाबत कोणीही सहन करेल हो... पण आता व्यावसाय म्हणून सतत वाढ होणारे हे पशुधन अशा पध्दतीने या भावात विकने हे शहानपणाचे लक्षण नाही हे कोणत्याही वेड्यालाही कळेल.....https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
पण..... ऊपाय तरी काय या परंपरेला...? कोणत्या बाजारात तुम्हाला तुमच्या मालाला मनाजोगी किंमत मिळनार आहे.? कोणत्या जातीच्या भावची हमी काहीच ठरलेली नाही.? शेळ्याची वजनानुसार विक्री व किलोनुसार दर हे ऐकायला बरं वाटतं..... प्रत्यक्षात मात्र अवघड आहे

*प्रती किलो वजनानुसार विक्री* हा फंडा फक्त शेळीपालन व्यावसायात नविन येणा-या लोकाना अडकवण्यासाठीच आहे असं किमान मला तरी वाटतं....
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
कारणही तसंच आहे हो नवखे असतात, य़ा व्यावसायाबद्दल मोठमोठ्या गोष्टी एेकलेल्या असतात, नामांकित वाटसअप ग्रुपचे सदस्य असतात, वाटसअप फेसबूक वर यशोगाथा पाहिलेल्या असतात, आधुनिक फार्मस् 😂 पाहिलेले असतात मग काय या मोहजालाला फसुन, आगतिक होऊन हाती असलेला पैसा बिनधास्तपणे गुंतवणार हे काहीजण हेरुनच असतात. अन त्यातच आपल्याकडील नामांकीत जाती चढ्या भावाने आगदी 1500-2000 ₹ प्रति किलोन विक्री करतात....
यांनी या भावाने आपल्याकडील 40-50 बकरे एकदाच विकुन दाखवावेतच.त्यांना फक्त आपल्यासारखे निवोदित ग्राहकच सापडतात.(मग कापतात चांगलंच आपल्याला बकरा समजून)
हे दाखवतात,भासवतात तेवढा यांचा ग्राहक वर्ग कधीच मोठा नसतो तर फक्त 2-4 शेळ्या घेणारा एखादा निवोदीतच असतो. म्हणूनच हे वाटसअपच्या पाच-पन्नास ग्रुपचे सदस्य असतात अन तिथं आपली मार्केटींग करतात *2 male or 4 female Shirohi/ bore/beetal for sale 6 month 40 Kg rate 1500₹per Kg* अशा यांच्या जाहिराती असतात.
फार्म विजीटच्या मोठमोठ्या फिस असतात अन आपन निवोदीत या जाळात फसतच जातो.
ऊलट एकही दलाल, व्यापारी, मटन विक्रेता या फंद्यात पडत नाही..
नगानुसार किंमत ठरवतो, सांगतो, द्यायचा तर द्या नाही तर जा असा मस्त सुरही एकवतो...
कारण त्याला माहिती आहे ग्राहकांना लोकल जातीचे मटन ही 400-450 ₹ किलोनेच विकायचे आहे आणि बोऱ,शिरोही,बिटल,जमनापारी या जातीचे मटणही ग्राहक त्याच भावानं विकत घेणार...!
ऊच्च, भारदस्त, देखण्या जातीच्या बक-याचं मटन आहे म्हणून ग्राहक थोडेच जास्त पैसे देणार आहे.....?
तेंव्हा नविन शेळीपालकांनी तुर्तास तरी या महागड्या जातींच्य मागे न लागता आपल्या बाजारात कोणती शेळी लवकर व कोणत्या पध्दतीनं (नगावर की किलोवर) विकली जाते त्यांचेच संगोपन करा बाकी व्यावसायाच्या सुरुवातीलाच ही आमुक जात अशी तमुक जात तशी याच्या मागे लागून पैसा वेळ मेहनत व्यार्थ घालू नका.
नवीन जातींच्या संगोपनाबद्दल ऊत्सुकता, आकर्षण, प्रयोगशीलता, नक्कीच असावी पण यशस्वी वाटचाल करतांना, अनुभव संपन्न झाल्यावर!
सुरुवातीलाच रिस्क आणि प्रयोग नको.....मोठा पैसा खर्चून प्रयोग फसला तर रडत बसण्याशिवाय पर्याय नसतो.....
या सर्व प्रपंचात माझा कोणाही नामांकित जातीच्या शेळीपालकांवर किंवा त्यांच्या विक्री कौशल्यावर आक्षेप अजिबात नाही त्यांनी त्यांच्या अनभवाचा, सोशल नेटवर्कींगचा त्याच्या व्यावसाय वाढीसाठी कोणते कौशल्य वापरावे हा ज्याचा त्याचा भाग आहे.
प्रश्न आहे तो निवोदित शेळीपालकांचा, आपल्याला कोणी स्वताच्या अल्प फायद्यासाठी वापरुन घेऊ नये याची त्यांनी डोळसपणे खबरदारी घ्यावी.
कारण आपल्या भारतीय माणसाची एक व्यावसायिक अडचण अशी आहे की आम्ही एखाद्या ऊच्च दर्जाच्या मालाचे विक्रमी ऊत्पादन करु शकतो मात्र ऊत्पादीत मालाच्या विक्री कौशल्यात आम्ही माती खातो...

डॉक्टर वसंत ढिकले

★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★ ★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय आणी इतर अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेतीमित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर , व्हाट्सअँप ग्रुप वर आणी मित्रांच्या टाईम लाईन वर शेअर करावी ही विनंती.
हि माहिती तुमच्या जरी उपयोगी नसेल तरी ती तुमच्या कोणी मित्रांच्या उपयोगी पडेल.
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★

या पेज वर जी माहिती दिली जाते त्याचे स?

30/07/2019

अर्धबंदिस्त शेळीपालनाने अवर्षणात तारले
अलीकडील चार- पाच वर्षांपासून दुष्काळामुळे बागायतदार शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत, त्यामुळे पूरक व्यवसायाचा पर्याय त्यांना खुणावू लागला आहे. नगर जिल्ह्यातील वडाळा येथील संजय मोटे देखील कृषी विभागाच्या मदतीने शेळीपालनाकडे वळले. २०, ७० अशा टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत आज २०० शेळ्यांचे अर्धबंदिस्त पद्धतीने पालन ते करताहेत. हायड्रोपोनिक्स तंत्र, मूरघास आदींच्या माध्यमातून भविष्यातील चारा व्यवस्थाही केली आहे.
संदीप नवले

नगर जिल्ह्यातील वडाळा (ता. नेवासा) येथील संजय मोटे यांची वडिलोपार्जित १२ एकर जमीन. सर्व जमीन भारी असून पावसाच्या पाण्यावरील म्हणजे जिरायती पाच एकर आहे. सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. संजय यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर शेती करण्यास सुरवात केली. शेतीबरोबर ठिबक सिंचन क्षेत्रातील कंपनीचे वितरक म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसू लागला. हळूहळू कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. दुसऱ्या बाजूला शेतीही सुरू होती. त्यामुळे विविध पीकपद्धती, योजनांची माहिती होती. यंदाच्या वर्षी त्यांनी संरक्षित पाण्याची सोय म्हणून शेततळेही घेतले. पूर्वीपासून सिंचनासाठी पाण्याची तशी व्यवस्था होती. त्यामुळे कांदा, रब्बी ज्वारी आदी पिके घेता आली. यातून कुटुंबाची रोजगारासाठीची भटकंती थांबली. मध्यंतरीच्या काळात गोपालन व्यवसायही सुरू करीत गायींची संख्या पाच ते सहापर्यंत वाढवली देखील होती. परंतु, अलीकडील वर्षांत अवर्षणाची स्थिती गंभीर झाली. जनावरांना पाणी कमी पडू लागले, कडब्याचे भाव वाढले. साहजिकच तोटा सहन करण्यापेक्षा हा व्यवसाय बंद केला.

शेळीपालनाचा पर्याय मिळाला
दुष्काळामुळे शेती करण्यास अडचणी येत असत. त्यामुळे हुकमी पूरक व्यवसायाच्या शोधात ते होते. कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाकडून त्यांना शेळीपालनाची माहिती मिळाली. आत्मा अंतर्गत महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प २००७ ते २०१४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यामध्ये संजय यांनी सहभाग घेतला. त्याअंतर्गत शेळीपालनासाठी चार लाख ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

शेळीपालन प्रकल्प उभा करण्यासाठी ‘आत्मा’चे अरुण कांबळे, कृषी अधिकारी विजय फाटके यांनी सहकार्य केले, त्यानंतर काही शेळीपालन व्यवसाय प्रत्यक्ष पाहण्याची संधीही मिळाली.

असे केले शेळीपालन
पुरेशा अभ्यासानंतर इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेळीपालन करायचे, असा निश्चय संजय यांनी केला. त्याचे प्राथमिक प्रशिक्षण देखील झाले होतेच. सन २०१३ मध्ये २० शेळ्या (उस्मानाबादी) आणि दोन बोकड खरेदी केले. गोठा आधीच तयार होता. त्यातच संगोपन सुरू केले. दुष्काळी परिस्थितीत शेतामध्ये चरण्यासाठी चारा उपलब्ध नव्हता, त्यामुळे अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. आज १०० बाय २५ फुटांचे शेड आहे, त्यात संगोपन सुरू आहे.

संजय यांचे शेळीपालन दृष्टिक्षेपात
- सध्या लहान- मोठ्या मिळून १५० शेळ्या, सर्व उस्मानाबादी.
- सुरवातीला ७० शेळ्यांची खरेदी व विमा यासाठी साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला.
- आत्तापर्यंत शेळ्या, बोकड, पाट मिळून एकूण २०० पर्यंत विक्री.
- शेळ्यांच्या कानाला क्रमांकांचे टॅग. त्याद्वारे गाभण- व्याल्याची तारीख, पिलांचे वजन. याबाबतच्या तारीखवार नोंदी. संजय या नोंदी व्हॅाट्सअॅप ग्रुपद्वारे डाॅक्टरांना पाठवितात, त्यावरून पुढील व्यवस्थापन करणे सोपे होते.
- दर महिन्याला शेळ्यांचे इलेक्ट्राॅनिक काट्यावर वजन. वजनवाढीच्या अनुषंगाने खुराक, वैद्यकीय सुविधांचे नियोजन.
- विविध आजारांसाठी नियमित प्रतिबंधक लसीकरण. दर महिन्याला जंतनाशक औषध.
- व्यालेल्या व भाकड शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जातात. वयानुसार नर आणि मादी यांचे वेगवेगळ्या ठिकाणी संगोपन.

विक्रीची पद्धत
ग्राहकांच्या मागणीनुसार शेळ्या, पाटी व बोकडांची विक्री केली जाते. शेळ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावर्षी सुमारे ४० बोकडांची आणि १५० शेळ्यांची विक्री केली. ४० ते ४५ किलो वजनाच्या बोकडाची विक्री किलोला ३०० रुपयेप्रमाणे, तर शेळ्यांची विक्री २५० रुपयांप्रमाणे केली. आता हा दर ३०० रुपये करण्याचा विचार आहे. आत्तापर्यंत एकूण सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. बकरी ईद व पैदाशीच्या हेतूने बोकडांना मागणी राहिली. ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी’मुळे (मौखिक प्रसिद्धी) विक्री सोपी झाली. जालना, बुलडाणा, सांगली, पारनेर, सुपा, बारामती येथील व्यापाऱ्यांकडून बोकडांची खरेदी झाली. यंदाच्या वर्षी बकरी ईदसाठी १५ बोकड विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संजय यांनी सांगितले.

दुष्काळात दिला आधार
अलीकडील वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे, त्यामुळे दुष्काळातही शेतीतून उत्पन्नाचे साधन नसताना शेळीपालनातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवल्याचे समाधान संजय यांना आहे.

विहिरीच्या पाण्याचा वापर
सध्या पाण्यासाठी एक विहीर व बोअरवेल आहे, त्याला पाणी कमी असते; परंतु कॅनाॅलला पाणी आल्यानंतर पाण्याचा प्रश्न हलका होतो. शेळ्यांना पाणी देण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने पाइपची सोय केली आहे.

चारा व्यवस्थापन
सध्या अनेक ठिकाणी चारा पिके घेणे पाण्याअभावी कमी झाले आहे; मात्र दुष्काळात मोटे यांनी चाऱ्याचे चांगले नियोजन केले आहे. एक एकरात आफ्रिकन टॉल मका आहे. मक्यापासून मध्यंतरी पाच टन मूरघास तयार केला होता. सध्या मका, ऊस अशी पिके असल्याने सुमारे अडीच- तीन महिने पुरेल इतका चारासाठा आहे.

हायड्रोपोनिक्स चारा
हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारानिर्मिती केली जाते. मक्याच्या एक किलो बियाण्यापासून १० दिवसांत ९ ते १० किलो चारा तयार होतो. एकूण १५० ट्रे आहेत. दररोज १२० किलो उत्पादन होते. युनिटला पाणी देण्यासाठी स्वयंचलित स्टार्टर पंप आहे. फाॅगिंग पद्धतीद्वारे सिंचन केले जाते.

सर्वांची साथ ठरली मोलाची
संजय यांना वडील भाऊसाहेब, आई सौ. अलका व पत्नी सौ. मीना यांची शेतीत मोठी साथ मिळते. शेळीपालनाच्या माध्यमातून एका व्यक्तीला रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे; तर व्यवस्थापनामध्ये डाॅ. भास्कर, डाॅ. वाघे, अशोक गायकवाड यांचे सहकार्य मिळते.

संजय मोटे - ९८९०७९९२७२, ९९६०८१८१८१

शेळीपालन व्यवसाय बद्दल अधिक माहिती साठी आपला ईद गोट-महाराष्ट्र हे फेसबुक पेज लाइक करावे.

https://m.facebook.com/Eid.Goats.mMaharashtra/

Interest

28/07/2019

शेळ्यांच्या विम्यासाठी अावश्यक बाबी
शेळ्यांचा विमा उतरवण्यासाठी अावश्यक बाबींची पूर्तता करावी लागते. विम्याच्या काही मर्यादा असून पशुविम्याद्वारे काही बाबींपासून संरक्षण मिळत नाही. विम्याच्या दाव्याची रक्कम शेळीची जात, वय, प्रकृती, गर्भारपणीची अवस्था आणि आजारी पडण्यापूर्वीची बाजारातील योग्य किंमत विचारात घेऊन ठरविली जाते.
डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. एस. एम. भोकरे, डॉ. डी. एम. खंडागळे

विम्याच्या दाव्यासंदर्भातील आवश्‍यक बाबी व कागदपत्रे -
१. शेळीच्या मृत्यूबाबत किंवा अपंगत्वाबाबत संबंधित कंपनीला ताबडतोब सूचना देणे आवश्‍यक असते.
२. विमा केलेल्या शेळीचे पोस्टमॉर्टम मान्यताप्राप्त पशुवैद्यकाकडून करून घेणे.
३. मेलेल्या शेळीचे फोटो (पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी व केल्यावर) ज्यामध्ये शेळीच्या अंगावरील ओळखीच्या खुणा (रंग, शिंगे, आकार, कानातील बिल्ला इत्यादी) दिसतात.
४. शेळीच्या कानातील बिल्ला, सुस्थितीत कंपनीला परत करणे अत्यावश्‍यक असते.
५. कंपनीचा विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज, पशुवैद्यकाने शेळीवर केलेल्या उपचाराचा दाखला, पोस्टमॉर्टम अहवाल किंवा शेळीस कायमस्वरूपी पूर्णतः अपंगत्व आले असल्यास तसा दाखला.
६. पंचनामा ज्यावर गावातील पाच पंचांच्या सह्या तसेच ग्रामसेवक/सरपंच यांचा सही व शिक्का असणे आवश्‍यक आहे.
७. वरील सर्व बाबींची पूर्तता केल्यावर संबंधित विमा कंपनीचे अधिकारी अथवा त्यांनी नेमणूक केलेला पशुवैद्यक विम्याच्या दाव्यासंदर्भात चौकशी करून खात्री करू शकतो.
८. कायमस्वरूपी पूर्णतः अपंगत्व आलेले विम्याचे जनावर कंपनीचा पशुवैद्यक स्वतः येऊन तपासू शकतो.
९. विम्याच्या दाव्याची रक्कम शेळीची जात, वय, प्रकृती, गर्भारपणीची अवस्था आणि आजारी पडण्यापूर्वीची बाजारातील योग्य किंमत विचारात घेऊन ठरविली जाते.

विम्याच्या मर्यादा -
- पशुविम्याद्वारे काही बाबींपासून संरक्षण मिळत नाही जसे की चोरी, जाणूनबुजून शेळीला इजा पोचवणे, विम्याचा फायदा मिळणार म्हणून विमा केलेल्या शेळीकडे दुर्लक्ष करणे, कानातील बिल्ला हरविणे आणि त्याची नोंद विमा कंपनीकडे न करणे, अयोग्य पद्धतीने आजारी शेळीवर उपचार करणे अथवा करवून घेणे तसेच लसीकरण न करणे किंवा अयोग्य पद्धतीने (जसे विमा न काढता किंवा वाहतुकीचे शासनाचे नियम न पाळणे) शेळ्यांची वाहतूक करताना मृत्यू येणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.
- एखाद्या भागात शेळ्यांच्या साथीचा आजार पसरत असेल किंवा कायमस्वरूपी आढळत असेल तर विमा संरक्षण मिळत नाही.

संपर्क - डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

शेळीपालन व्यवसाय बद्दल अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करावे हि विनंती.
https://m.facebook.com/Eid.Goats.mMaharashtra/

Interest

Address

आडगाव खुर्द
Shirdi
423107

Telephone

9987084946

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समृद्धी गोट फार्म प्रायव्हेट लिमिटेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share