सोजत गोट

सोजत गोट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सोजत गोट, Pet service, आडगाव खुर्द, Shirdi.

🍅 टोमॅटो पिकासाठी नवीन पद्धतीने बांबूचा आधार / तारकाठी करण्याची पद्धत 🍅वरील व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर करून आपल्या सर्व श...
14/12/2019

🍅 टोमॅटो पिकासाठी नवीन पद्धतीने बांबूचा आधार / तारकाठी करण्याची पद्धत 🍅
वरील व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर करून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवनवीन माहिती मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून लाल घंटी चे बटन क्लिक करा म्हणजे येथून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील

🍅 टोमॅटो पिकासाठी बांबूचा साठा तयार करणे याबद्दल माहिती चा व्हिडिओ

17/08/2019

शेळीपालन व्यावसायाशी निगडीत तसेच या व्यावसायाशी नव्याने जोडू पाहणा-या तसेच हा व्यावसाय करु ईचि्छणा-या तमाम सहकारी बांधवांना नम्र विनंती आहे की ब-याचदा ग्रुपवर चर्चा करतांना निवोदित शेळीपालक बांधव आफ्रिकन बोर, बिटल, शिरोही, जमनापारी, बारबरी,सुरती ईत्यादी महागड्या जातींच्या शेळ्याबद्दलच अधिक चविने चर्चा करतांना दिसतात...
हा व्यावसाय नव्याने करु पाहत असलेल्या व सुरु केलेल्या माझ्या तमाम सहकारी बांधवांनाे आपल्याला या व्यावसायात पाय घट्ट रोवायचा असेल जम बसवून नफा कमवायचा असेल तर सांगीव, एेकीव माहितीवरुन सुरुवातीलाच या महागड्या शेळ्यांच्या जातींच्या मागे लागू नका. आपल्या परिसरातील लोकल जातीच्या, *(पारंपारीक गावठी जातीच्या)* फारफार तर ऊस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करुन शेळीच्या आणि सबंध शेळीपालनाच्या या व्यावसाय चक्राचे आवलोकन करा. समस्या, ऊपाय, व्यावस्थापन, हक्काचे शाश्वत मार्केट, आणि नफा कमावण्याची शक्कल व्यावस्थित जमली तरच प्रयोग म्हणून बोर, बिटल, जमनापारी, सुरती, शिरोही, बारबेरी या पैकी एखाद जातीच्या संगोपनाचा विचार करावा....
एक साधा विचार करा... समजा या महागड्या जातींच्या शेळ्यांचे संगोपन करुनही या आपल्याकडे लोकल मार्केटमधे चालू प्रचलीत दरांनुसारच विकावे लागणार असेल तर ... या महागड्या जातींचे संगोपन म्हणजे एक मृगजळच ठरेल.
ऊदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या जर लोकल जातीचा बकरा बाजारात दलाल किंवा मटन शाॅपवाले सरासरी 220-240 ₹ किलो ने घेत असतील तर 25-30 किलो वजनाच्या बक-याचेही अदाजे सरासरी सुमारे 5500-6500₹ मिळतील ही आपली अपेक्षा असते किंवा तेवढे मिळावे हा अट्टहास असतो. पण एकंदरीतच दलाल किंवा मटन विक्रेत यांची व्यावसायीक पाॅलिसी पाहता ते लोक गरिब शेळीसारखाच शेळीपालकाला समजून सरासरी 4000 ते 4300 ₹ च्या वर भाव द्यायला सहजा सहजी तयारच होत नाहीत... परिणाम स्वरुप शेळीपालक आपल्या व्यावसायीक मर्यादा व आर्थिक निकड लक्षात घेऊन नाविलाजास्तव या चक्रव्यहात सापडतो व नफा तोटा याचा जास्त विचार न करता आपल्या पशूची विक्री करत राहतो....
बरं हे गणित एखाद दुस-या पशुंच्या विक्रीबाबत कोणीही सहन करेल हो... पण आता व्यावसाय म्हणून सतत वाढ होणारे हे पशुधन अशा पध्दतीने या भावात विकने हे शहानपणाचे लक्षण नाही हे कोणत्याही वेड्यालाही कळेल.....https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
पण..... ऊपाय तरी काय या परंपरेला...? कोणत्या बाजारात तुम्हाला तुमच्या मालाला मनाजोगी किंमत मिळनार आहे.? कोणत्या जातीच्या भावची हमी काहीच ठरलेली नाही.? शेळ्याची वजनानुसार विक्री व किलोनुसार दर हे ऐकायला बरं वाटतं..... प्रत्यक्षात मात्र अवघड आहे

*प्रती किलो वजनानुसार विक्री* हा फंडा फक्त शेळीपालन व्यावसायात नविन येणा-या लोकाना अडकवण्यासाठीच आहे असं किमान मला तरी वाटतं....
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
कारणही तसंच आहे हो नवखे असतात, य़ा व्यावसायाबद्दल मोठमोठ्या गोष्टी एेकलेल्या असतात, नामांकित वाटसअप ग्रुपचे सदस्य असतात, वाटसअप फेसबूक वर यशोगाथा पाहिलेल्या असतात, आधुनिक फार्मस् 😂 पाहिलेले असतात मग काय या मोहजालाला फसुन, आगतिक होऊन हाती असलेला पैसा बिनधास्तपणे गुंतवणार हे काहीजण हेरुनच असतात. अन त्यातच आपल्याकडील नामांकीत जाती चढ्या भावाने आगदी 1500-2000 ₹ प्रति किलोन विक्री करतात....
यांनी या भावाने आपल्याकडील 40-50 बकरे एकदाच विकुन दाखवावेतच.त्यांना फक्त आपल्यासारखे निवोदित ग्राहकच सापडतात.(मग कापतात चांगलंच आपल्याला बकरा समजून)
हे दाखवतात,भासवतात तेवढा यांचा ग्राहक वर्ग कधीच मोठा नसतो तर फक्त 2-4 शेळ्या घेणारा एखादा निवोदीतच असतो. म्हणूनच हे वाटसअपच्या पाच-पन्नास ग्रुपचे सदस्य असतात अन तिथं आपली मार्केटींग करतात *2 male or 4 female Shirohi/ bore/beetal for sale 6 month 40 Kg rate 1500₹per Kg* अशा यांच्या जाहिराती असतात.
फार्म विजीटच्या मोठमोठ्या फिस असतात अन आपन निवोदीत या जाळात फसतच जातो.
ऊलट एकही दलाल, व्यापारी, मटन विक्रेता या फंद्यात पडत नाही..
नगानुसार किंमत ठरवतो, सांगतो, द्यायचा तर द्या नाही तर जा असा मस्त सुरही एकवतो...
कारण त्याला माहिती आहे ग्राहकांना लोकल जातीचे मटन ही 400-450 ₹ किलोनेच विकायचे आहे आणि बोऱ,शिरोही,बिटल,जमनापारी या जातीचे मटणही ग्राहक त्याच भावानं विकत घेणार...!
ऊच्च, भारदस्त, देखण्या जातीच्या बक-याचं मटन आहे म्हणून ग्राहक थोडेच जास्त पैसे देणार आहे.....?
तेंव्हा नविन शेळीपालकांनी तुर्तास तरी या महागड्या जातींच्य मागे न लागता आपल्या बाजारात कोणती शेळी लवकर व कोणत्या पध्दतीनं (नगावर की किलोवर) विकली जाते त्यांचेच संगोपन करा बाकी व्यावसायाच्या सुरुवातीलाच ही आमुक जात अशी तमुक जात तशी याच्या मागे लागून पैसा वेळ मेहनत व्यार्थ घालू नका.
नवीन जातींच्या संगोपनाबद्दल ऊत्सुकता, आकर्षण, प्रयोगशीलता, नक्कीच असावी पण यशस्वी वाटचाल करतांना, अनुभव संपन्न झाल्यावर!
सुरुवातीलाच रिस्क आणि प्रयोग नको.....मोठा पैसा खर्चून प्रयोग फसला तर रडत बसण्याशिवाय पर्याय नसतो.....
या सर्व प्रपंचात माझा कोणाही नामांकित जातीच्या शेळीपालकांवर किंवा त्यांच्या विक्री कौशल्यावर आक्षेप अजिबात नाही त्यांनी त्यांच्या अनभवाचा, सोशल नेटवर्कींगचा त्याच्या व्यावसाय वाढीसाठी कोणते कौशल्य वापरावे हा ज्याचा त्याचा भाग आहे.
प्रश्न आहे तो निवोदित शेळीपालकांचा, आपल्याला कोणी स्वताच्या अल्प फायद्यासाठी वापरुन घेऊ नये याची त्यांनी डोळसपणे खबरदारी घ्यावी.
कारण आपल्या भारतीय माणसाची एक व्यावसायिक अडचण अशी आहे की आम्ही एखाद्या ऊच्च दर्जाच्या मालाचे विक्रमी ऊत्पादन करु शकतो मात्र ऊत्पादीत मालाच्या विक्री कौशल्यात आम्ही माती खातो...

डॉक्टर वसंत ढिकले

★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★ ★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय आणी इतर अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेतीमित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर , व्हाट्सअँप ग्रुप वर आणी मित्रांच्या टाईम लाईन वर शेअर करावी ही विनंती.
हि माहिती तुमच्या जरी उपयोगी नसेल तरी ती तुमच्या कोणी मित्रांच्या उपयोगी पडेल.
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★

या पेज वर जी माहिती दिली जाते त्याचे स?

30/07/2019

अर्धबंदिस्त शेळीपालनाने अवर्षणात तारले
अलीकडील चार- पाच वर्षांपासून दुष्काळामुळे बागायतदार शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत, त्यामुळे पूरक व्यवसायाचा पर्याय त्यांना खुणावू लागला आहे. नगर जिल्ह्यातील वडाळा येथील संजय मोटे देखील कृषी विभागाच्या मदतीने शेळीपालनाकडे वळले. २०, ७० अशा टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत आज २०० शेळ्यांचे अर्धबंदिस्त पद्धतीने पालन ते करताहेत. हायड्रोपोनिक्स तंत्र, मूरघास आदींच्या माध्यमातून भविष्यातील चारा व्यवस्थाही केली आहे.
संदीप नवले

नगर जिल्ह्यातील वडाळा (ता. नेवासा) येथील संजय मोटे यांची वडिलोपार्जित १२ एकर जमीन. सर्व जमीन भारी असून पावसाच्या पाण्यावरील म्हणजे जिरायती पाच एकर आहे. सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. संजय यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर शेती करण्यास सुरवात केली. शेतीबरोबर ठिबक सिंचन क्षेत्रातील कंपनीचे वितरक म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसू लागला. हळूहळू कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. दुसऱ्या बाजूला शेतीही सुरू होती. त्यामुळे विविध पीकपद्धती, योजनांची माहिती होती. यंदाच्या वर्षी त्यांनी संरक्षित पाण्याची सोय म्हणून शेततळेही घेतले. पूर्वीपासून सिंचनासाठी पाण्याची तशी व्यवस्था होती. त्यामुळे कांदा, रब्बी ज्वारी आदी पिके घेता आली. यातून कुटुंबाची रोजगारासाठीची भटकंती थांबली. मध्यंतरीच्या काळात गोपालन व्यवसायही सुरू करीत गायींची संख्या पाच ते सहापर्यंत वाढवली देखील होती. परंतु, अलीकडील वर्षांत अवर्षणाची स्थिती गंभीर झाली. जनावरांना पाणी कमी पडू लागले, कडब्याचे भाव वाढले. साहजिकच तोटा सहन करण्यापेक्षा हा व्यवसाय बंद केला.

शेळीपालनाचा पर्याय मिळाला
दुष्काळामुळे शेती करण्यास अडचणी येत असत. त्यामुळे हुकमी पूरक व्यवसायाच्या शोधात ते होते. कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाकडून त्यांना शेळीपालनाची माहिती मिळाली. आत्मा अंतर्गत महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प २००७ ते २०१४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यामध्ये संजय यांनी सहभाग घेतला. त्याअंतर्गत शेळीपालनासाठी चार लाख ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

शेळीपालन प्रकल्प उभा करण्यासाठी ‘आत्मा’चे अरुण कांबळे, कृषी अधिकारी विजय फाटके यांनी सहकार्य केले, त्यानंतर काही शेळीपालन व्यवसाय प्रत्यक्ष पाहण्याची संधीही मिळाली.

असे केले शेळीपालन
पुरेशा अभ्यासानंतर इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेळीपालन करायचे, असा निश्चय संजय यांनी केला. त्याचे प्राथमिक प्रशिक्षण देखील झाले होतेच. सन २०१३ मध्ये २० शेळ्या (उस्मानाबादी) आणि दोन बोकड खरेदी केले. गोठा आधीच तयार होता. त्यातच संगोपन सुरू केले. दुष्काळी परिस्थितीत शेतामध्ये चरण्यासाठी चारा उपलब्ध नव्हता, त्यामुळे अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. आज १०० बाय २५ फुटांचे शेड आहे, त्यात संगोपन सुरू आहे.

संजय यांचे शेळीपालन दृष्टिक्षेपात
- सध्या लहान- मोठ्या मिळून १५० शेळ्या, सर्व उस्मानाबादी.
- सुरवातीला ७० शेळ्यांची खरेदी व विमा यासाठी साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला.
- आत्तापर्यंत शेळ्या, बोकड, पाट मिळून एकूण २०० पर्यंत विक्री.
- शेळ्यांच्या कानाला क्रमांकांचे टॅग. त्याद्वारे गाभण- व्याल्याची तारीख, पिलांचे वजन. याबाबतच्या तारीखवार नोंदी. संजय या नोंदी व्हॅाट्सअॅप ग्रुपद्वारे डाॅक्टरांना पाठवितात, त्यावरून पुढील व्यवस्थापन करणे सोपे होते.
- दर महिन्याला शेळ्यांचे इलेक्ट्राॅनिक काट्यावर वजन. वजनवाढीच्या अनुषंगाने खुराक, वैद्यकीय सुविधांचे नियोजन.
- विविध आजारांसाठी नियमित प्रतिबंधक लसीकरण. दर महिन्याला जंतनाशक औषध.
- व्यालेल्या व भाकड शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जातात. वयानुसार नर आणि मादी यांचे वेगवेगळ्या ठिकाणी संगोपन.

विक्रीची पद्धत
ग्राहकांच्या मागणीनुसार शेळ्या, पाटी व बोकडांची विक्री केली जाते. शेळ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावर्षी सुमारे ४० बोकडांची आणि १५० शेळ्यांची विक्री केली. ४० ते ४५ किलो वजनाच्या बोकडाची विक्री किलोला ३०० रुपयेप्रमाणे, तर शेळ्यांची विक्री २५० रुपयांप्रमाणे केली. आता हा दर ३०० रुपये करण्याचा विचार आहे. आत्तापर्यंत एकूण सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. बकरी ईद व पैदाशीच्या हेतूने बोकडांना मागणी राहिली. ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी’मुळे (मौखिक प्रसिद्धी) विक्री सोपी झाली. जालना, बुलडाणा, सांगली, पारनेर, सुपा, बारामती येथील व्यापाऱ्यांकडून बोकडांची खरेदी झाली. यंदाच्या वर्षी बकरी ईदसाठी १५ बोकड विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संजय यांनी सांगितले.

दुष्काळात दिला आधार
अलीकडील वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे, त्यामुळे दुष्काळातही शेतीतून उत्पन्नाचे साधन नसताना शेळीपालनातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवल्याचे समाधान संजय यांना आहे.

विहिरीच्या पाण्याचा वापर
सध्या पाण्यासाठी एक विहीर व बोअरवेल आहे, त्याला पाणी कमी असते; परंतु कॅनाॅलला पाणी आल्यानंतर पाण्याचा प्रश्न हलका होतो. शेळ्यांना पाणी देण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने पाइपची सोय केली आहे.

चारा व्यवस्थापन
सध्या अनेक ठिकाणी चारा पिके घेणे पाण्याअभावी कमी झाले आहे; मात्र दुष्काळात मोटे यांनी चाऱ्याचे चांगले नियोजन केले आहे. एक एकरात आफ्रिकन टॉल मका आहे. मक्यापासून मध्यंतरी पाच टन मूरघास तयार केला होता. सध्या मका, ऊस अशी पिके असल्याने सुमारे अडीच- तीन महिने पुरेल इतका चारासाठा आहे.

हायड्रोपोनिक्स चारा
हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारानिर्मिती केली जाते. मक्याच्या एक किलो बियाण्यापासून १० दिवसांत ९ ते १० किलो चारा तयार होतो. एकूण १५० ट्रे आहेत. दररोज १२० किलो उत्पादन होते. युनिटला पाणी देण्यासाठी स्वयंचलित स्टार्टर पंप आहे. फाॅगिंग पद्धतीद्वारे सिंचन केले जाते.

सर्वांची साथ ठरली मोलाची
संजय यांना वडील भाऊसाहेब, आई सौ. अलका व पत्नी सौ. मीना यांची शेतीत मोठी साथ मिळते. शेळीपालनाच्या माध्यमातून एका व्यक्तीला रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे; तर व्यवस्थापनामध्ये डाॅ. भास्कर, डाॅ. वाघे, अशोक गायकवाड यांचे सहकार्य मिळते.

संजय मोटे - ९८९०७९९२७२, ९९६०८१८१८१

शेळीपालन व्यवसाय बद्दल अधिक माहिती साठी आपला ईद गोट-महाराष्ट्र हे फेसबुक पेज लाइक करावे.

https://m.facebook.com/Eid.Goats.mMaharashtra/

Interest

21/07/2019

★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★
★★★★★★★★
ऍग्रो स्पेशल
कारले, दोडका पिकांतून बदलतेय शेतीचे अर्थकारण बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथील मधुकर शिंगणे या तरुण शेतकऱ्याने कारले पिकाचे अर्थकारण समजावून घेऊन त्याच्या शेतीवर भर दिला आहे. वर्षभरात कारले दोन हंगामांत त्यांनी घेतले. हे पीक आर्थिक सक्षमीकरणासाठी चांगले ठरल्याचा अनुभव त्यांनी घेतला. जोडीला दाेडके व टाेमॅटाे पिकांमधूनही शेतीच्या अर्थकारणाला त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला अाहे.
गोपाल हागे

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावमही गावातील उत्तमराव शिंगणे यांची पाच एकर शेती होती. मधुकर अाणि कृष्णा अशी त्यांना दाेन मुले. पूर्वी ते कापूस, साेयाबीन, तूर यासारखी पिके घ्यायचे. गुंठा- दाेन गुंठ्यांत भाजीपाला पिकवून गावच्या बाजारात नेऊन विकायचे. भाजीपाल्यामुळे घरात दरराेज पैसा येतो हे शिंगणे कुटुंबाला ज्ञात झाले हाेते. कालपरत्वे वयाेमानामुळे त्यांनी भाजीपाल्याकडे लक्ष कमी केले. मात्र त्यांचा वसा दाेन्ही मुलांनी म्हणजे मधुकर अाणि कृष्णा यांनी अंगिकारला.

कारले पिकाची निवड
देऊळगावमही भागातील शेतकऱ्यांची भाजीपाला पिकांत सर्वाधिक पसंती टाेमॅटाेला अाहे. बऱ्याचदा माल जास्त निघाला की टाेमॅटाेचे भाव गडगडतात, त्यामुळे या पिकाच्या जोडीला अन्य पर्यायी व हुकमी पीक घेण्याच्या दृष्टीने मधुकर यांनी मागील वर्षी कारले पिकाची निवड केली. लागवडीपूर्वी काही ठिकाणी जाऊन माहिती मिळवली. कारल्यावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली हाेती. मात्र मधुकर यांनी काटेकोर व्यवस्थापन करण्याची तयारी ठेवली.

दोन हंगामांत कारले
मधुकर यांनी मार्चमध्ये पहिली लागवड केली. मे ते जुलै या काळात प्लॉट सुरू राहिला. जैविक, सेंद्रिय घटकांचा वापर करण्यावर अधिक भर दिला. एक एकर क्षेत्रातून सुमारे १७०० क्रेट (प्रति क्रेट १३ किलो) उत्पादन मिळाले. प्रति क्रेट ४०० ते ५०० रुपयांदरम्यान दर मिळाला. खर्च वजा जाता सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत मिळकत राहिली.

पहिल्या प्रयोगातून आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्या वर्षीच्याच जूनमध्ये दुसरी लागवड केली. या काळात सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये पाऊस, थंडी यांचा थोडा फटका बसला. साधारण ९०० ते ९३० क्रेट एवढे उत्पादन मिळाले. त्या वेळी साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती आले.

या वर्षीही कारले
मराठवाड्याला लागून असलेल्या या भागात तेवढीच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली हाेती. अनेकांना उभी पिके साेडून द्यावी लागली. सुदैवाने मधुकर यांच्या शेतापासून काही अंतरावर खडकपूर्णा प्रकल्प असल्याने त्यांच्याकडे पाण्याची थाेडी उपलब्धता हाेती. त्या जाेरावर त्यांनी मे महिन्यात अर्धा एकरात कारल्याची लागवड केली. सध्या त्यातून उत्पन्न सुरू आहे. अात्तापर्यंत सुमारे २५० क्रेट कारले बाजारात नेऊन विकले अाहेत. या वर्षी अन्य भागांतून आवक कमी असल्याने कारल्याला चांगले भाव मिळत अाहेत. क्रेटला ५०० ते ८०० रुपयांदरम्यान अाजवर कारल्याची विक्री केल्याचे मधुकर यांनी सांगितले.

दोडका पिकाचा प्रयोग
यंदा उन्हाळ्यात सुमारे पाऊण एकरात दाेडका पिकाचा प्रयोग केला. आत्तापर्यंत ५०० क्रेट माल विकून झाला अाहे. त्यास १५ ते २० दिवस या कालावधीत क्रेटला (प्रति क्रेट) एक हजार रुपये दर मिळाला. सध्या हे दर घसरले आहेत. सध्या किलोला ५० रुपये दर सुरू आहे. सध्या कारले व दोडका हे दाेन्ही प्लॉट चांगल्या स्थितीत असून, दरराेज माल विक्री केला जात अाहे.

सेंद्रिय घटकांचा वापर
मधुकर यांनी कारले शेतीत सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला आहे. लागवडीपूर्वी तीन ट्रॉली शेणखत वापरले. बीजप्रक्रिया केली. उगवणीनंतर १५ दिवसांपासून जैविक स्लरीचा वापर सुरू केला. या स्लरीच जैविक कल्चर, गायीचे शेण, गाेमूत्र, गूळ, कडधान्याचे मिश्रण यांचा वापर केला. त्याशिवाय कडुनिंब, रुई, करंजी, सीताफळ अादी झाडांचा पालाही त्यात वापरला. ठराविक प्रमाण घेऊन ठिबक व फवारणीद्वारे त्याचा वापर केला, त्यामुळे मालाचा दर्जा टिकवण्यास मदत झाली. किडींच्या नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर केला.

ठिबक झाले, विहीर खाेदली, गाडीही घेतली
शेतात नव्याने ठिबक केले आहे. या वर्षी मेमध्ये विहीर खाेदली. बांधकाम व खाेदाईसाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मधुकर व त्यांचा भाऊ अशा दोघांनी दोन फोर व्हीलर खरेदी केल्या आहेत. कारले पिकातील उत्पन्नाचाच यात मोठा वाटा असल्याचे मधुकर म्हणाले. स्वतः दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मधुकर यांचा मुलगा बारावीत शिकत अाहे. त्याला उच्च शिक्षण देण्याचे त्यांनी ठरविले अाहे.

बाजारपेठेत मागणी
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवल्याने त्याचा दर्जा व रंग उच्चतम मिळाला आहे. मधुकर यांच्या शेतातील कारल्याला व्यापारी पहिली पसंती देताता. शिवाय इतरांच्या तुलनेत भावही अधिक मिळत असल्याचे मधुकर म्हणाले. देऊळगावराजा, जालना, मेहकर, चिखली या बाजारांमध्ये हा माल विक्रीला नेतात. ग्राहकांतही शिंगणे यांचा भाजीपाला लोकप्रिय झाला अाहे.

शेतातच वास्तव्य
देऊळगावमही गावात दाेघा भावांची चांगली सुसज्ज घरे अाहेत; परंतु भाजीपाल्याची शेती सुरू केल्यापासून दाेघांचीही कुटुंबे अाता शेतातच राहतात. साहजिकच शेतातील कामे वेळेवर करता येतात. रात्रंदिवस शेतीकडे लक्ष राहते. मजूर महिलांना गावातून गाड्यांमध्ये बसवून शेतात अाणण्याची सोय केली आहे, त्यामुळे मजूर अानंदाने त्यांच्याकडे कामास येण्यास तयार हाेतात.

मधुकर शिंगणे-८४१२००७०११

★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★
★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान,शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणी अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेती मित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर शेर करावी ही विनंती.
https://m.facebook.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-1763340707236563/
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★

Local business

14/07/2019

कोंबड्यांना द्या पर्यायी खाद्य घटक
कुक्कुट खाद्यामध्ये मका व सोयाबीनचा ऊर्जा व प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या खाद्य घटकावरील ताण कमी करण्यासाठी त्यास पर्याय म्हणून असणारे खाद्य घटक उपयोगात आणणे जरुरीचे आहे. त्यासाठी काही पारंपरिक खाद्यघटकांचा सहजपणे कुक्कुटखाद्यात समावेश करता येतो.
डॉ. मुकेश कापगते, डॉ. मयूर विसपुते

कुक्कुट पालनामध्ये ६५ ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. अपारंपरिक खाद्य घटकांची किंमत त्यांच्या उपलब्धतेवर, अवलंबून असते. मका व सोयाबीनच्या कमी उपलब्धतेमुळे स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असणाऱ्या खाद्य घटकांचा वापर करणे अपरिहार्य ठरते. विभिन्न पीक पद्धती व हवामानामुळे विविध अपारंपरिक खाद्य घटक उपलब्ध होतात. परंतु, खाद्य घटकांची पोषकता, आहार उपयुक्तता, त्यांचा सुरक्षित स्तरावर आहारातील समावेश व त्यातील अपायकारक घटकांबद्दल विश्‍वसनीय माहितीचा अभाव यामुळे हे घटक कमी प्रमाणात वापरले जातात. त्यासाठी पारंपरिक खाद्यघटकातील अपायकारक घटक कमी करण्याच्या प्रक्रिया जाणून घेऊन पारंपरिक घटकांचा कुक्कुटखाद्यात सुरक्षित अंतर्भाव करावा.

१. ज्वारी :
- कुक्कुट खाद्यात मक्यानंतर ज्वारी हे तृणधान्य वापरतात.
- ज्वारीमध्ये ०.२ ते २.० टक्के टॅनिन हा घटक असतो. जो कोंबड्यांसाठी अपायकारक असतो. पांढऱ्या रंगाच्या ज्यारीच्या वाणामध्ये टॅनिनचे प्रमाण कमी असते तर लालसर रंगाच्या ज्वारीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते.
- ज्वारीचे लेअर कोंबड्यांच्या वाढीच्या अवस्थेत मक्याला पर्याय म्हणून वापरली जाऊ शकते.
- अलीकडच्या काळात ज्वारीचे पिवळे वाण विकसित झाल्यामुळे कुक्कुट खाद्यात ज्वारीचा समावेश मक्याच्या ७५ टक्के इतका यशस्वीरीत्या करता आला.
- ज्वारीतील टॅनिनचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आहारातील प्रथिनांची उपलब्धता कमी होते व पक्ष्यांची वाढ खुंटते. यासाठी ज्वारीतील टॅनिन कमी करण्यासाठी विविध पद्धती विकसित करण्यात अाल्या अाहेत.

२. गहू :
- तुटलेला, जाडा - भरडा, निष्कृष्ट दर्जाचा किंवा चांगल्या दर्जाचा गहू कुक्कुट आहारात वापरता येतो.
- ----अरॅबिनोझायलान्स हा अपायकारक पदार्थ पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये इतर अन्नद्रव्यांच्या शोषणास बाधा निर्माण करते. काढणीच्या हंगामानंतर लगेचच गव्हाचा वापर पक्ष्यांच्या खाद्यात केल्याने त्याचा काही भाग पक्ष्यांच्या चोचीला चिकटून बसतो व चोचीचा काही भाग कुजला जाऊ शकतो.
- ---अरॅबिनोझायलान्समुळे लहान पिल्ले गव्हाचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.
- गव्हाचा पक्षांच्या खाद्यामध्ये समावेश करण्यापूर्वी गहू जाडेभरडे दळणे व त्यात ५ टक्के तेलरहित---भाताचा कोंडा मिसळणे गरजेचे आहे.
- खाद्यामध्ये गव्हाचा समावेश असेल तर अरॅबिनोझायलान्स या अपायकारक पदार्थांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी झायलानेज या विकाराचा समावेश करणे फायदेशीर ठरत आहे.

३. भाताची कणी :
- भाताची कणी लहान मांसल पक्ष्यांमध्ये १० टक्के तर मोठ्या मांसल पक्ष्यांमध्ये २० टक्के या प्रमाणात वापरता येते. भाताच्या कणीमध्ये अपायकारक घटक नसतो.

४. बाजरी :
- मका व ज्वारी यांच्या तुलनेत बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. प्रभावी परिणामासाठी बाजरीचा मक्याच्या ३० टक्केपर्यंत अंतर्भाव करू शकतो.
- बाजरीवर कठीण तंतुमय आवरण असल्याने त्याची उपलब्ध ऊर्जा मक्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे पक्षी खाद्यातील बाजरीचा समावेश मर्यादित आहे.

५. ओट :
- अोटमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त (१०-१२ टक्के) असल्याने अोट चा कुक्कुट खाद्यामध्ये मर्यादित समावेश केला जातो. ओटमध्ये बीटा- ग्लूकॅन्स हा अपायकारक पदार्थ आढळतो.
- बीटा - ग्लूकॅन्समुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारते व पक्ष्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.

६. भाताचा कोंडा :
- भाताचा कोंडा साधा व तेलरहित असा दोन प्रकारांत मिळतो. साध्या भाताच्या कोंड्यात ऊर्जेचे प्रमाण जास्त असते तर तेलरहित भाताच्या कोंड्यात ऊर्जेचे प्रमाण कमी असते.
- तेलरहित भाताचा कोंडा वापरल्याने खाद्यात धुळीचे प्रमाण वाढते व त्याची रुचकरता कमी होते. ही समस्या कमी करण्यासाठी खाद्यामध्ये ....चरबी किंवा उसाची मळी मिसळावी.
- भाताच्या कोंड्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त काळ साठवणूक केल्यास भात कोंड्याचा कुबट वास येतो.
- भात कोंड्यामध्ये दळलेल्या टरफलांची भेसळ केली जाते, त्यामुळे त्यात तंतुमय पदार्थ व रेती यांचे प्रमाण वाढते.

७. गवार कोर्मा / चुरा :
- यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४०-४२ टक्के असते. तसेच ट्रीप्सिन इनहिबिटर, हिमॅग्लुटिनिन आणि युरिएज हे अपायकारक पदार्थ असतात.
- अपायकारक पदार्थ कमी करण्यासाठी गवार कोर्म्याला गरम शेक देणे गरजेचे आहे. याचा उपयोग २.५ ते ५ टक्के पर्यंत कुक्कुट खाद्यात केला जाऊ शकतो.

टीप - वरील खाद्य घटक तज्ञांच्या सल्ल्यानेच कोंबड्यांना द्यावेत.

संपर्क : डॉ. मुकेश कापगते, ९५३६१०४९०८
(केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली, उत्तर प्रदेश)

★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★ ★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय आणी इतर अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेतीमित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर , व्हाट्सअँप ग्रुप वर आणी मित्रांच्या टाईम लाईन वर शेअर करावी ही विनंती.
हि माहिती तुमच्या जरी उपयोगी नसेल तरी ती तुमच्या कोणी मित्रांच्या उपयोगी पडेल.
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★

या पेज वर जी माहिती दिली जाते त्याचे स?

Address

आडगाव खुर्द
Shirdi
423107

Telephone

9987084946

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोजत गोट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category