07/06/2023
# मावीम, चंद्रपूर राज्यातून प्रथम पारितोषिकांने झाले सन्मानित #
माविम च्या वार्षिक आढावा बैठकिचे आयोजन दिनांक ५ ते ७ जून २०२३ या कालावधी मध्ये ग्रेप काउंटी रिसॉर्ट, त्रंबकेश्वर रोड, वाढोली फाटा, अंजनेरी , नाशिक येथे घेण्यात आले..
सदर आढाव्या दरम्यान विविध घटका अंतर्गत नागपूर विभागाचे सादरीकरण मा.राजू इंगळे,विभागीय साधन व्यक्ती,माविम, नागपूर विभाग यांनी केले... जिल्यातील विविध स्तरावरील कंवर्जन्स, सब प्रोजेट्ट, क्रेडिट लिंकेज इत्यादी घटका अंतर्गत उत्कृष्ट काम केल्या बद्दल माविम, चंद्रपूर च्या संपूर्ण टिम ला मा, इंदू जाखड (भा. प्र. से.), व्यवस्थापकीय संचालक, माविम, मुंबई यांच्या हस्ते पारितोषिक व प्रशास्तीपत्र देऊन गौरविण्यात आले..
खऱ्या अर्थाने मा. नरेश उगेमुगे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, मावीम चंद्रपूर यांच्या परिश्रमाचे व त्यांचा मार्गदर्शना खाली जिल्ह्यातील सम्पूर्ण टीम व सी एम आर सी यांचा एकत्रित परिश्रमातुन हे साध्य होऊ शकले आहे.. माविम चे उद्धीष्ट साध्य करत राज्यातील प्रथम क्रमांक चा जिल्हा म्हणून माघील कित्तेक वर्षाचे हे स्वप्न आज इथे साकार झालं म्हणायला काही हरकत नाही.. परंतु या पुरस्कारा सोबतच आपल्या जबाबदाऱ्या देखील निश्चितच वाढल्या आहेत.. प्रथम स्थान कायम ठेवन्यासाठी येत्या दिवसात परिश्रमाची पराकाष्टा आपल्याला निश्चितच करावी लागणार आहे...
तीन दिवशीय आढावा बैठकी दरम्यान सह्यांद्री fpc, नेचर वोक इत्यादी विषय देखील घेण्यात आले... आढाव्या सोबतच सम्पूर्ण टीम मध्ये नवीन ऊर्जा संचारल्या सारखी वाटली.. नवे संकल्पा सह या आढावा बैठकीचा समरोप आज रोज दि.07/06/2023 ला करण्यात आला..
माविम, चंद्रपूर च्या जिल्ह्यातील सम्पूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा....